🕒 1 min read
पुणे : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पुन्हा खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये तिसरा विजय नोंदवला आहे. लीगच्या ४६वा सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादला (SRH vs CSK) १३ धावांनी मात दिली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. ऋतुराज गायकवाड (९९) आणि डेव्हॉन कॉनवे (नाबाद ८५) यांच्या दमदार सलामीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला २०३ धावांचे आव्हान दिले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १८२ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची गाडी २० षटकात १८९ धावांपर्यंतच थांबली. हैदराबादकडून निकोलस पूरनने नाबाद ६४ धावांची झुंज दिली.
हैदराबादचा डाव
अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी हैदराबादसाठी ५८ल धावांची सलामी दिली. मुकेश चौधरीने अभिषेकला (३९) बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पुढच्याच चेंडूवर मुकेशने राहुल त्रिपाठीला (०) बाद केले. विल्यमसनने ४७ धावांची संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने एका बाजूने फटकेबाजी केली, पण अपेक्षित धावांचे अंतर जास्त असल्याने त्याचे प्रयत्न अपुरे पडले. पूरनने ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. २० षटकात हैदराबादने ६ बाद १८९ धावा केल्या. चेन्नईकडून मुकेशने ४ बळी घेतले.
Blockbuster opening and a ???? Climax! What a close to Sunday! ????#SRHvsCSK #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/Z1xrRAPaW8
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 1, 2022
चेन्नईचा डाव
आज संधी मिळालेल्या डेव्हॉन कॉनवेने ऋतुराजसोबत सलामी दिली. या दोघांनी हैदराबादच्या दमदार गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला आणि ११व्या षटकात शतकी भागीदारी रचली. ऋतुराजने आपल्या घरच्या मैदानावर आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली, तर कॉनवेने त्याला उत्तम साथ दिली. १५व्या षटकात कॉनवेने आपले पहिले अर्धशतक साजरे केले. याच षटकात दोघांनी मार्को जानसेनला २० धावा ठोकत दीडशतकी भागीदारी पूर्ण केली. शतकाकडे कूच करणाऱ्या ऋतुराजला नटराजनने फसवले. १८व्या षटकात ऋतुराज ९९ धावांवर असताना झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. पहिल्या गड्यासाठी ऋतुराज-कॉनवेने १८२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॉनवेवने शेवटच्या षटकात चेन्नईला ११ धावा मिळवून दिल्या. कॉनवेने ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या. २० षटकात चेन्नईने २ बाद २०२ धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महीश थिक्षना
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
