🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील खराब फॉर्मवर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, त्याला या दोन खेळाडूंच्या फॉर्मची चिंता नाही. याचे कारण म्हणजे विश्वचषक अजून दूर आहे आणि तोपर्यंत हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये परत येऊ शकतात.
विराट कोहलीने या आयपीएल सीझनमध्ये त्याने १३ मॅचमध्ये केवळ २३६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी १९.६७ होती. या मोसमात तीनवेळा गोल्डन डकचा बळी असताना त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. रोहित शर्माची अवस्थाही अशीच आहे. १२ सामन्यांत तो १८.१७च्या सरासरीने केवळ २१८ धावा करू शकला आहे. यादरम्यान तो एकदा शून्यावर बाद झाला, तर पाच वेळा त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहित शर्माला या मोसमात एकदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
Sourav Ganguly believes India's top players Virat Kohli and Rohit Sharma will be back in form before the T20 World Cup begins. #ViratKohli #RohitSharma #T20WorldCup pic.twitter.com/CcCCVQy6OL
— Cricket.com (@weRcricket) May 16, 2022
गांगुली म्हणाला, ”रोहित आणि विराटच्या खराब फॉर्मची मला अजिबात चिंता नाही. ते खूप चांगले आणि खूप मोठे खेळाडू आहेत. विश्वचषक अजून दूर आहे आणि मला खात्री आहे की हे खेळाडू स्पर्धेपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये असतील.” आयपीएलनंतर भारतीय संघाला अनेक टी-20 मालिका खेळायच्या आहेत आणि त्यानंतर या खेळाडूंना पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
