मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. अभिनेत्री कियारा अडवाणी हिने सुशांत च्या काही रहस्यमय गोष्टी सांगून सुशांतच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भावूक केले आहे. कियारा तिच्या आगामी चित्रपट भूल भुलैया 2 च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.
कियाराला जुना मित्र आणि आपला सहअभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, २०१६ मध्ये आलेल्या ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’चे आम्ही औरंगाबादमध्ये शूटिंग केलं. नंतर पहाटे चार वाजता आम्हाला फ्लाईट होती म्हणून आम्ही आठच्या आसपास पॅक केले. सुशांत सोबत मी त्यावेळी रात्रभर गप्पा मारल्या आणि त्याच्याबद्दल खूप काही जाणून घेतलं.
कियाराने सांगितले की सुशांत खूप पुस्तके वाचायचा, त्याच्याकडे नेहमी मोठी मोठी पुस्तके असायची. तो जीवनाबद्दल, लोकांबद्दल खूप उत्सुक होता. सुशांत सिंग फक्त दोन तास झोपायचा. तो त्याच्या कामाबद्दल खूप उत्साही होता. दोन तास झोपायचा आणि म्हणायचा माणसाला फक्त दोन तासांची झोप लागते. एखाद्या व्यक्तीने कितीही झोप घेतली तरी, त्याचा मेंदू फक्त दोन तास विश्रांतीच्या स्थितीत जातो. त्यामुळे फक्त दोन तासांची झोप लागते. दोन तासांच्या झोपेनंतर तो दुसऱ्या दिवशी तंदुरुस्त दिसत होता, असं कियाराने म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

