Share

राज्यातील 9 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज!

Published On: 

मुंबई :  मे महिना आता अर्धा संपला आहे. आता पावसाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. या वर्षी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आता ‘असनी’ चक्रीवादळाचे संकट दूर झाले आहे. म्हणूनच आता दाखल होण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. केरळ आणि दक्षिण भारतातील काही राज्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पावसाने दमदार हेजेरी लावली आहे.

महाराष्ट्र राज्यातही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती गतीने होत असल्याने, पुढील काही तासांच्या अवधीत हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पाऊस पडेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तसेच उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जरी करण्यात आला आहे. ‘येलो अलर्ट’ म्हणजेच जोरदर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!