मुंबई : आयपीएल २००२ (IPL 2022)च्या ६३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG vs RR) २४ धावांनी पराभव केला. या विजयानंतर राजस्थानचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, तर पराभवामुळे लखनऊचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षक रियान परागने असे कृत्य केले, ज्यामुळे तो आता सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.
खरेतर, खनऊच्या डावाच्या २०व्या षटकात रियान परागने प्रसिध कृष्णाच्या लाँग-ऑनवर मार्कस स्टॉइनिसचा झेल घेतला. त्याचा झेल घेत राजस्थानने आपले दोन गुण निश्चित केले. मात्र, झेल पकडल्यानंतर परागने ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले, त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परागने झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीच्या अगदी जवळ नेला आणि त्याला चेंडूला जमिनीला स्पर्श करायचा आहे असे भासवले.
सोशल मीडियावरील चाहत्यांचे परागशी नेहमीच वेगळे नाते राहिले आहे. पण यावेळी मॅथ्यू हेडन आणि इयान बिशपसारखे समालोचकही २० वर्षीय परागच्या सेलिब्रेशनवर नाराज दिसले.
https://twitter.com/kunaalyaadav/status/1525902304120999936
Riyan Parag is the most irritating player I've ever seen…. Don't know what he thinks about himself… ????????
— Mιтнι✨ (@Messiemind_) May 15, 2022
https://twitter.com/cricbrij/status/1525861564724654082
या सामन्यात राजस्थानने २० षटकांत ६ बाद १७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि लखनऊला ८ बाद १५४ धावांवर रोखले. राजस्थान १३ सामन्यांत ८व्या विजयासह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर लखनऊ १३ सामन्यांतील पाचव्या पराभवानंतर १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

