🕒 1 min read
मुंबई : मुंबईत १४ मे रोजी झालेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा विरोधकांना भारी पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. प्रत्येक फटकाऱ्याने विरोधकांचे दात घशात घातले. यानंतर फडणविसांनी या सभेची तुलना ‘टोमणे सभा’, ‘टोमणे बॉम्ब’ अशी केली. यानंतर सामना अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“उद्धव ठाकरे यांचे फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर प्रत्यक्ष घाव, फटके व हल्ले किती भयंकर असतील? उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले आहे, असा टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे. भाजपचे पुढारी देशभरात इतरांना ‘बुस्टर’ डोस देत फिरत असतात, पण मुंबईतील शिवसेनेच्या सभेने या मंडळींना जहाल बुस्टर डोस देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला”.
‘मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसांना सामील असलेल्या सर्व नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा ठाकरे यांनी देऊन भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे. शिवसेनेला कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल, हाच शिवसेनेच्या वादळी सभेचा इशारा आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे’.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
