🕒 1 min read
मुंबई : पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव करून आयपीएल २०२२मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. आता त्यांच्या दुसऱ्या लीग सामन्यापूर्वी, स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यांसोबत मजेशीर पद्धतीने नाचताना दिसत आहे.
या डान्समध्ये कगिसो रबाडा, ओडिन स्मिथ, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार यांनी धवनला साथ दिली. पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. “पंजाबी तडका आणि कॅरेबियन मस्ती”, असे कॅप्शन धवनने या व्हिडिओला दिले.
मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने रविवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आरसीबीच्या २०५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. ओडीन स्मिथने केवळ ८ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. शाहरुख खानने स्मिथसोबत चांगले योगदान देत २४ धावा केल्या. पंजाब किंग्जचा पुढील सामना शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 RCB vs KKR : कोण जिंकणार आजचा सामना? ‘या’ संघाचं पारडं आहे जड!
- “एसटी संपाला भाजपची फूस”- नाना पटोले
- यश क्षितिजा पलीकडचं! कैलास खासबागेंचा सिक्युरिटी गार्ड ते पोलीस उपनिरीक्षक पदाचा प्रवास
- काश्मीर फाईल्सचा विदेशात डंका, थेट ब्रिटिश संसदेतून विवेक अग्निहोत्रींना निमंत्रण
- IPL 2022 : शोएब अख्तरचा KKRविषयी मोठा खुलासा; म्हणाला “माझ्यासाठी गांगुली कोचला…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
