मुंबई: लखनऊ सुपर जायट्सचा कर्णधार केएल राहुलने हैदराबादविरुद्ध अर्धशतक झळकावून आयपीएलच्या विशेष क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने ५० चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळे लखनऊ संघाने हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला. ज्यात त्याने वीरेंद्र सेहवागच्या एका रेकॉर्डला मोडीत काढलं आहे.
केएल राहुलने (KL Rahul) आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १३ अर्धशतके केली आहेत. आता आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत वीरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) मागे राहिला आहे. केएल राहुल त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये फलंदाजी करताना त्याने आपली छाप सोडली आहे. केएल राहुलने आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध कर्णधार म्हणून अर्धशतक झळकावून विशेष कामगिरी केली आहे. केएल राहुल आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १३ अर्धशतकांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
याआधी या पदावर माजी दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) कर्णधार वीरेंद्र सेहवाग आणि डेक्कन चार्जर्सचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट (adam gilchrist) होते. आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या बाबींवर भारतीय संघातील खेळाडूंचे वर्चस्व असते. आयपीएलमध्ये कर्णधार असताना विराट कोहलीचे नाव सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. कर्णधार म्हणून त्याने ४० वेळा पन्नास मारण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर गौतम गंभीर ३१ आणि मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा २३ वेळा अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

