🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही असे संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटले आहे. तर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राऊतांना डिवचले आहे.
“मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर…”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे. दरम्यान या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने स्वतःची कबर खोदली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच अलिबागची ती जागा एक एकरही नाही. माझ्या पत्नीच्या किंवा तिच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत. त्यात ईडीला मनी लॉन्ड्रिंग दिसायला लागलं. राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊन कारवाया जातात हे पाहिलं. आमचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं. भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
उर्वशी रौतेला ‘oops’ मूमेंटची शिकार; पहा काय आहे नेमकं प्रकरण
IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता लखनऊचे शिलेदारही धावणार; मुंबईच्या पोराला देणार आव्हान!
“ये लो कॅलरी जेवण…” रितेश देशमुखचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ पाहिलात का?
“…दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी”; मनसेचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
