मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज सुसाट फॉर्मात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसनचा राजस्थान संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे, तर आरसीबीला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता आणि दुसऱ्या सामन्यात निसटता विजय मिळाला होता.
हेड टू हेड आकडेवारीत आरसीबीचा वरचष्मा आहे. बंगळुरूने १२ सामने जिंकले असून राजस्थान रॉयल्सने १० सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. दोन्ही संघांमधील शेवटचे ४ सामने आरसीबीने जिंकले आहेत. विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीसाठी ५७९ धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर सर्वाधिक २६० धावा आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीच्या सध्याच्या गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलने १२ विकेट घेतल्या आहेत.
दोन्ही संघांची Playing XI
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान ), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रूदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
- भाजप नेते अनिल बोंडेंना तीन महिने कारावासाची शिक्षा
- वाढदिवसानिमित्त जाणून घ्या नॅशनल क्रश ‘रश्मिका मंदान्ना’ बद्दल काही खास गोष्टी
- राज ठाकरेंच्या घरी नातवाचे आगमन ; अमित ठाकरे झाले बाबा
- “छत्रपती संभाजी महाराजांचे अश्रू हे निखाऱ्याचं स्वरूप घेतील”- आशिष शेलार
- मास्टर ब्लास्टरने पुन्हा अनुभवला मुंबईतील ‘बालपणीचा काळ’; ‘बेस्ट’चे फोटो केले चाहत्यांसोबत शेअर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

