🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये, आज स्पर्धेतील २४वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन आमनेसामने आले आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ चारपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सनेही चारपैकी तीन सामने जिंकले असून आहेत. आज रंगणाऱ्या सामन्यात संजूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाची आतापर्यंतची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. संघातील अनेक खेळाडू चांगल्या लयीत असल्याचे दिसत असून ते गुजरात टायटन्ससाठी अडचणीचे ठरू शकतात. जोस बटलर, देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर हे फलंदाजीसह उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. अश्विन आणि चहलची जोडी प्रतिस्पर्धी संघांसाठी सतत अडचणीत येत आहे. युवा कुलदीप सेननेही शेवटच्या सामन्यात आपले कौशल्य दाखवले.
दुसरीकडे गुजरात टायटन्सने अनेक सामन्यांमध्ये शानदार खेळ दाखवला. मात्र, संघाला शेवटच्या सामन्यात स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला. पराभव झाला तरी संघाच्या कामगिरीला कमी लेखता येणार नाही. फलंदाजीत मात्र संघ अव्वल फळीतील शुबमन गिलवर अधिक अवलंबून असल्याचे दिसते. हार्दिक पंड्या मधल्या फळीत सातत्याने धावा करत आहे पण त्याच्याकडून चांगल्या स्ट्राईक रेटची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), रॅसी व्हॅन डर डुसेन, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, रियान पराग, जेम्स नीशम, कुलदीप सेन, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स – मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल.
महत्त्वाच्या बातम्या –
- VIDEO : चहलच्या बायकोचा वरुण धवनसोबत भन्नाट डान्स; पाहा कोणत्या गाण्यावर थिरकले हे स्टार!
- “अहो राऊतसाहेब, सत्तेसाठी तुम्ही…” ; केशव उपाध्येंच्या संजय राऊतांवर जोरदार पलटवार
- …त्याआधी सावरकरांना भारतरत्न द्या; राऊतांचा सरसंघचालकांना टोला
- IPL 2022 : सलग पाच पराभवानंतरही मुंबई जिंकणार ट्रॉफी; फक्त करावी लागणार ‘ही’ गोष्ट!
- व्वा क्या सीन है…! पाकिस्तानच्या खेळाडूसोबत क्रिकेट खेळतोय भारताचा ‘स्टार’ फलंदाज; पाहा PHOTO!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
