मुंबई : सरसंघचालक मोहन भागवतजी, यांनी आपण प्रयत्न केल्यास १०-१५ वर्षात अखंड भारताचं स्वप्न साकार होईल, असे विधान केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १५ वर्ष नव्हे तर १५ दिवसांत अखंड हिंदुस्तानचं स्वप्न साकार करू असं वचन द्या, असं विधान केले. दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, “अहो राऊतसाहेब, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलेच आहे. हे वारंवार सिद्ध का करताय? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभलं तर देश कराचीतही भगवा फडकवेल असं विधान तुम्ही जाहीर व्यासपीठावरून केले होते. मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेने १८ खासदार निवडून आले. विधानसभेतही मोदी नावाचा जप राऊत करतच होते. परंतु सत्तेसाठी भ्रष्ट्रवादींसोबत आघाडी करावी लागली.”
“बरं ते अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. तुम्ही सत्ता टिकवण्याचं बघा आणि हो २०२४ च्या लोकसभेत शिवसेनेचे किमान खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर तुमचीही गत साडे तीन जिल्ह्याच्या नेत्याप्रमाणेच व्हायची,” असा टोला केशव उपाध्ये यांनी राऊतांना लगावला.
काय म्हणाले होते संजय राऊत
”अंखड भारताचे स्वप्न कुणाचे असेल तर आम्ही त्याचे आम्ही स्वागतच करतो. त्याला देशातील कुठलाही पक्ष विरोध करणार नाही, यापूर्वी भाजपने या मुद्द्यांवर मते मागितली. आधी पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, अफगाणीस्तान घ्या, मग एक अखंड भारत निर्माण करा. जो भाग यापूर्वी हिंदुस्थानचा होता, तो भाग घ्या. त्याआधी स्वांतत्रवीर सावरकरांना भारतरत्न द्या, सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अंखड हिंदुस्थान ही संकल्पना राबवली, रुजवली त्यांचे आभार माना. काश्मिरी पंडीतांना पुन्हा परत आणा,” असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.
तर १० ते १५ वर्षातच अखंड भारताची निर्मिती होईल
”भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. अगदी त्याचप्रकारे संत आणि महंत यांच्या आशीर्वादाने लवकरच अखंड भारताची निर्मिती होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षातच अखंड भारताची निर्मिती होईल. अखंड भारत हा अजेंडा कायमच महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातला अखंड भारत १० ते १५ वर्षात होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जो या मार्गात येईल तो संपेल,” असे मोहन भागवत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2022 : सलग पाच पराभवानंतरही मुंबई जिंकणार ट्रॉफी; फक्त करावी लागणार ‘ही’ गोष्ट!
- व्वा क्या सीन है…! पाकिस्तानच्या खेळाडूसोबत क्रिकेट खेळतोय भारताचा ‘स्टार’ फलंदाज; पाहा PHOTO!
- JALGAON | दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है जिंदगी भर के लिये बदनाम किया है – एकनाथ खडसे
- IPL 2022 : CSK पाठोपाठ टीम इंडियालाही धक्का..! आता काय करणार रोहित शर्मा?
- आंबेडकर जयंतीला डॉल्बी लावण्यावर बंदी, नागरिकांचा रास्ता रोको
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

