मुंबई : “पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहायला मिळेल.” असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. हिंदू धर्म हाच सनातन धर्म आहे असेही मोहन भागवत म्हणाले होते. यावरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. मोहन भागवत यांनी हरिद्वार मध्ये श्रीकृष्ण निवास आश्रम या ठिकाणी ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या प्रसंगी ते बोलत होते.
”अंखड भारताचे स्वप्न कुणाचे असेल तर आम्ही त्याचे आम्ही स्वागतच करतो. त्याला देशातील कुठलाही पक्ष विरोध करणार नाही, यापूर्वी भाजपने या मुद्द्यांवर मते मागितली. आधी पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, अफगाणीस्तान घ्या, मग एक अखंड भारत निर्माण करा. जो भाग यापूर्वी हिंदुस्थानचा होता, तो भाग घ्या. त्याआधी स्वांतत्रवीर सावरकरांना भारतरत्न द्या, सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अंखड हिंदुस्थान ही संकल्पना राबवली, रुजवली त्यांचे आभार माना. काश्मिरी पंडीतांना पुन्हा परत आणा,” असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.
”भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. अगदी त्याचप्रकारे संत आणि महंत यांच्या आशीर्वादाने लवकरच अखंड भारताची निर्मिती होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षातच अखंड भारताची निर्मिती होईल. अखंड भारत हा अजेंडा कायमच महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातला अखंड भारत १० ते १५ वर्षात होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जो या मार्गात येईल तो संपेल,” असे मोहन भागवत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- व्वा क्या सीन है…! पाकिस्तानच्या खेळाडूसोबत क्रिकेट खेळतोय भारताचा ‘स्टार’ फलंदाज; पाहा PHOTO!
- JALGAON | दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है जिंदगी भर के लिये बदनाम किया है – एकनाथ खडसे
- IPL 2022 : CSK पाठोपाठ टीम इंडियालाही धक्का..! आता काय करणार रोहित शर्मा?
- आंबेडकर जयंतीला डॉल्बी लावण्यावर बंदी, नागरिकांचा रास्ता रोको
- IPL 2022 : हिटमॅन बनला दहा हजारी मनसबदार..! फॉर्मात नसलेल्या रोहितची टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

