Share

IPL 2022 : आयपीएलमध्ये खतरनाक गोलंदाजी करणाऱ्या ‘या’ भारतीय खेळाडूवर रोहितचा डोळा; T20 विश्वचषक संघात लागू शकते वर्णी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: RCBचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएलच्या १३व्या सामन्यात राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर फलंदाजाला धावा करण्याच्या खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे आता त्याची वर्णी T20 विश्वचषकात लागू शकते.

हर्षल पटेलने आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे. स्पर्धेतील प्रेशरमुळे गोलंदाज आपली लाईन-लेंथ विसरतात आणि एका षटकात जास्त धावा खर्च करतात. पण, हर्षल पटेलने (harshal patel) आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना खूप प्रभावित केले आहे. गेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानविरुद्ध गोलंदाजी करताना पटेलने ४ षटकात १८ धावा देत १ बळी घेतला. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ४. ५० होता. हा इकॉनॉमी रेट T20 टूर्नामेंटमध्ये खूप महत्त्वाचा असतो.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (rohit sharma) यंदाच्या T20 विश्वचषक २०२२ मध्ये संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. तो आयपीएलच्या माध्यमातून आगामी T20 विश्वचषकाची तयारी करू इच्छितो. आयपीएलमध्ये जो कोणी चांगली कामगिरी करेल, त्या खेळाडूसाठी टीम इंडियासाठी दरवाजे उघडतील हे उघड आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला त्याच्या संघात धोकादायक वेगवान गोलंदाज हर्षल पटेलचा समावेश नक्कीच करू शकतो.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!