मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरविण्यात यावे, यासाठी मोठी भूमिका घेतली होती. त्यांनी राज्य सरकारला याबाबत अल्टीमेटमही दिला होता. त्यानुसार राज्यातील बऱ्याच ठिकाणी मशिदीवरील भोंगे खाली उतरले आहेत. मात्र त्या बरोबरच हिंदू मंदिरांवरील भोंगेही उतरविण्यात आले आहेत. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत नाराजी जाहीर केली आहे.
“शिर्डी, पंढरपुर ,त्र्यंबकेश्वर या धार्मिक पिठावरून काकडा आरती बंद, ग्रामीण भागात १० नंतर किर्तन सेवा बंद. कोरोनानंतर आता कुठे अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, किर्तन, सुरळीत सुरु झाली होती. यात्रा महोत्सव सुरु झाले. मात्र या धार्मिक वातावरणाला या भोंग्यांमुळे छेद गेला.”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
शिर्डी, पंढरपुर ,त्र्यंबकेश्वर या धार्मिक पिठावरून काकडा आरती बंद, ग्रामीण भागात १० नंतर किर्तन सेवा बंद. कोरोनानंतर आता कुठे अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, किर्तन, सुरळीत सुरु झाली होती. यात्रा महोत्सव सुरु झाले. मात्र या धार्मिक वातावरणाला या भोंग्यांमुळे छेद गेला.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 5, 2022
तसेच पंढरपूर, तुळजापूर ही महाराष्ट्रातील शक्तीपीठे आहेत. चुकीच्या घाणेरड्या राजकारणामुळे हा फटका मुस्लिम, हिंदू व इतर धर्मियांनाही बसलाय . शेवटी विठ्ठल मंदिरातील पंढरपुर मधील भोंगे खाली उतरले हे ऐकून वाईट वाटतय. हे पाप कुणाचं? विचार करा. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये श्रावण, आषाढी, कर्तिकी या महिन्यात धार्मिक वातावरण असते. यानिमित्त ग्रामीण भागात वारकरी व इतर भजनाची परंपरा आहे. रात्री १० नंतर भोंग्याला परवानगी नसल्याने ही परंपरा मागे पडेल. असेही मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेना कोणालाही पाठिशी घालत नाही मग तो…”, ‘त्या’ प्रकरणावरून शितल शेठ यांचा केशव उपाध्येंना टोला
- “मी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो”, रावसाहेब दानवे यांचे मोठे वक्तव्य
- “बाबरी पाडताना दुर्बिणीनं शोधूनही तिथे शिवसैनिक दिसला नाही”, रावसाहेब दानवेंचा टोला
- पुण्यात सरपंचावर गोळीबाराचा प्रयत्न, दगडाने ही हल्ला!
- “…हेच का तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..?”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका


