Share

IPL 2022 CSK vs RCB : काहीही म्हणा, पण किंग तो किंगच…! ‘फ्लॉप’ विराट कोहलीनं रचला ‘हिट’ विक्रम; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये काल बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात सामना खेळला गेला, या सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे. लीगमध्ये ५००० चेंडूंचा सामना करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात विराटने ३० धावा केल्या. चेन्नईच्या मोईन अलीने त्याचा त्रिफळा उडवला.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून खेळण्यासाठी विराट कोहली मैदानात उतरला होता. त्याच्यासोबत कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही डावाची सुरुवात केली. सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याच्या बाबतीत शिखर धवन आणि रोहित शर्मा विराट कोहलीच्या मागे आहेत. या यादीत त्याच्याशिवाय डेव्हिड वॉर्नरचाही समावेश आहे. मात्र, कोहलीशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने ५००० चेंडूंचा सामना केलेला नाही.

कोहलीने आयपीएल कारकिर्दीत ६ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो संघर्ष करताना दिसला. या मोसमात त्याची बॅट चालली नाही. याशिवाय इतर सामन्यांमध्येही तो फ्लॉप ठरला आहे.

असा रंगला सामना…

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ जवळपास आयपीएल २०२२ (IPL 2022) बाहेर झाला आहे. लीगच्या ४९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला (RCB vs CSK) १३ धावांनी मात दिली. महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिकच्या महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर बंगळुरुने चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईकडून महिश थिक्षणाने तीन बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे वगळता इतर फलंदाज फ्लॉप ठरले. २० षटकात चेन्नईचा संघ ८ बाद १५९ धावांपर्यंतच पोहोचू शकला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!