🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जला (CSK vs RCB) मात दिली आणि प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले. लीगच्या ४९व्या साखळी सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा १३ धावांनी पराभव झाला. या सामन्यात चेन्नईच्या डावादरम्यान अशी घटना पाहायला मिळाली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्टेडियममध्ये उपस्थित एका मुलीने आपल्या प्रियकराला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. या प्रपोजचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ आरसीबीने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मुलीने तिच्या प्रियकराला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले. आरसीबीची जर्सी घातलेल्या मुलाला मुलीने अंगठी दिली. यानंतर दोघांनीही हसत मिठी मारली. आजूबाजूच्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचे अभिनंदन केले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
Santhosham ga undandi???????? pic.twitter.com/houNPcolYW
— Varma Nadimpalli (@Varma____) May 4, 2022
असा रंगला सामना…
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ जवळपास आयपीएल २०२२ (IPL 2022) बाहेर झाला आहे. लीगच्या ४९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला (RCB vs CSK) १३ धावांनी मात दिली. महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिकच्या महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर बंगळुरुने चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईकडून महिश थिक्षणाने तीन बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे वगळता इतर फलंदाज फ्लॉप ठरले. २० षटकात चेन्नईचा संघ ८ बाद १५९ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
