Share

OBC Reservation : “…हा विरोधकांचा रडीचा डाव”, अजित पवारांनी सुनावले

Published On: 

मुंबई:  हायकोर्टाने OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. यावरूनच भाजपने ठाकरे सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. तर यावरच उपमुख्यमंत्री अजीत पवार (ajit pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“विरोधकांचा रडीचा डाव आहे. ओबीसीबाबत सरकारने योग्य भूमिका मांडली आहे. सभागृहात विरोधकांच्या मदतीने ठराव झाले आहेत. ओबीसींना आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला आहे त्यावर आज मुख्यमंत्री बैठक घेत आहेत.”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच आम्ही शेवटपर्यंत ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. चांगलं झालं तर आम्ही मिळून केलं आणि चांगलं झालं नाही मग हे सरकारची चूक आहे असे विरोधक ओरडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयामुळे OBC आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. राज्यात साधारण १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून त्या २०२० च्या प्रभागरचनेनुसार घेण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!