मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील आज डबल हेडरचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात स्पर्धेचा यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सातपैकी पाच सामने जिंकून बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, हैदराबादचा संघ सहापैकी चार सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे.
आरसीबीच्या संघाने या स्पर्धेत आतापर्यंत शानदार खेळ दाखवला असून या संघाने त्यांचे मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. कर्णधार फाफ डू प्लेसिसही फॉर्ममध्ये परतला असून ही संघासाठी चांगली बातमी आहे. खालच्या क्रमवारीत शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक यांच्या फलंदाजीने सतत धावा केल्या आहेत. मॅक्सवेलने अष्टपैलू म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत जोश हेजलवुड संघासाठी चांगली गोलंदाजी करताना दिसला आहे. त्याचवेळी मोहम्मद सिराजही गेल्या सामन्यात चांगल्या लयीत दिसला. मात्र, संघाला चिंता असेल ती विराट कोहलीचा फॉर्म.
Toss Update from the Brabourne Stadium ????@SunRisers win the toss and opt to bowl first against @RCBTweets ????#TATAIPL #RCBvSRH pic.twitter.com/QBO1WHqFmv
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
हैदराबादच्या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते, मात्र त्यानंतर संघाने सलग चार विजय नोंदवत विजयाचा मार्ग राखला. राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम यांनी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि फलंदाजीची क्रमवारी उत्तम प्रकारे हाताळली आहे. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांच्याकडून अधिक चांगले योगदान अपेक्षित आहे. संघाचे गोलंदाजी आक्रमण खूपच संतुलित दिसत आहे. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन फलंदाजांना अडचणीत आणत आहेत. तर दुसरीकडे उमरान मलिक आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे फलंदाजांच्या मनात धडकी भरवत आहे.
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

