Share

IPL 2022 RCB vs RR : बंगळुरूनं जिंकला टॉस; सर्वांच्या नजरा जोस बटलरवर!

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या १५व्या हंगामातील (IPL 2022) ३९वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs RR) यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा जोस बटलरवर आहेत. राजस्थानसाठी बटलरने यंदा तीन शतके ठोकली असून तो तुफान फॉर्मात आहे.

राजस्थान रॉयल्सने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि चांगल्या नेट रनरेटमुळे संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ५ एप्रिल रोजी राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात सामना झाला होता. त्यानंतर बंगळुरूने ४ विकेट्सने विजय मिळवला. दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका साकारली होती. हेड टू हेड आकडेवारीमध्ये, बंगळुरूचा वरचष्मा आहे. बंगळुरूने १३ सामने जिंकले असून राजस्थान रॉयल्सने १० सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधले शेवटचे ५ सामने आरसीबीने जिंकले आहेत.

दोन्ही संघांची playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरिल मिशेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!