🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना आज रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि लखनऊ सुपर जाइंट्स यांच्यात संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ पुढे जाईल तर पराभव झालेला संघाचा प्रवास येथेच संपेल. विजय-पराभव याशिवाय आणखी एक गोष्ट आहे ज्याचा या सामन्यावर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोलकात्यातील हवामान चांगले नाही आणि आजच्या सामन्यावरही पावसाची सावट दिसत आहे.
आज आयपीएल एलिमिनेटरमध्ये लखनऊ आणि बंगळुरूचे संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे कारण ज्या संघाचा पराभव होईल त्याचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगणार आहे. मात्र काही कारणास्तव सामना होऊ शकला नाही तर आयपीएलच्या नवीन नियमांनुसार, साखळी टप्प्यात अधिक गुण मिळवणारा संघ विजयी घोषित केला जाईल.
कालच्या क्वालिफायर सामन्यावरही पावसाचे ढग साचले होते. काल दिवसभर पाऊस पडत होता. मात्र संध्याकाळी सामन्यादरम्यान पावसाने कोणताही गोंधळ घातला नाही. पण एलिमिनेटरमध्ये पाऊस खलनायक ठरू शकतो. गेल्या दोन दिवसांपासून कोलकात्यात वादळ आणि पावसाचा चांगलाच तडाखा सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान हलका पाऊस पडू शकतो. त्यामुळे सामन्यातील एकूण षटकात कपात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
All the cards are on the table and everything to play for. ????????
Chapter 2️⃣ against the Super Giants. ⚔️ #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #LSGvRCB pic.twitter.com/a2ZDYuhM1i
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
हवामान स्थिर
सकाळपासून कोलकातामध्ये हवामान स्थिर होते. पाऊस येण्याची जास्त चाहूल जाणवत नव्हती. आकाश पूर्णपणे निरभ्र होते. सायंकाळच्या सुमारास वातावरण कसे असेल याचीच सर्वांनाच चिंता असणार आहे. दुपारपर्यंत वातावरण पूर्णपणे मोकळे झाले होते. सूर्य चमकत होता आणि आकाश देखील पूर्णपणे निरभ्र होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
