नवी दिल्ली : ईशा गुप्ता सध्या तिच्या आगामी ‘आश्रम ३’ या वेब सीरीजमुळे सारखी चर्चेत आहे. वेब सीरीजमध्ये बोल्ड सिन्स करणारी अभिनेत्री ईशा सध्या तिचा बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस गुलरसोबत फिरायला गेली आहे. यादरम्यान ईशाने बॉयफ्रेंडसोबतचे रोड ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. सध्या त्या फोटोंनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
ईशा आणि तिचा बॉयफ्रेंड बहरीनमधील पनामा शहरात फिरण्यासाठी गेले आहेत. या ठिकाणाहून अभिनेत्रीने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशाने जांभळ्या रंगाच्या ट्राउझर्ससह पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केलेला दिसत आहे. तिने बॉयफ्रेंडसोबतचे पण फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा गुप्ता बॉयफ्रेंडसोबत आराम करताना दिसत आहे. पनामा शहराचे फोटो आणि व्हिडीओ ईशाने तिच्या स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले ‘वन डे इन पनामा.’
https://www.instagram.com/p/Cd-VF_7JqzL/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी देखील ईशा गुप्ताचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये ईशा बाथरूममध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये ईशा खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती.
https://www.instagram.com/p/Cd7nGcDAIf9/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोमध्ये ईशा गुप्ताने स्काय ब्लू कलरच्या ट्राउझर्ससह ब्रॅलेट स्टाइल क्रीम कलर टॉप घातला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

