मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा एलिमिनेटर सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगेल. आयपीएल २०२२मध्ये, ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीने विजय मिळवला होता.
आयपीएलच्या १५व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने १४ सामन्यांत ९ विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ सामन्यांत ८ विजयांसह चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी जागा मिळवली. लखनऊसाठी त्याचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांची फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. आरसीबीसाठी वानिंदू हसरंगा खूप यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीही फॉर्ममध्ये परतला आहे.
Business end of #IPL2022. ????????
Let’s get this done. ????????????
Tune into @StarSportsIndia or @DisneyPlusHS and catch the high octane action from the Eden Gardens, 7:30 PM IST onwards. ????#PlayBold #WeAreChallengers #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB #PlayOffs pic.twitter.com/kIv4SM8PEH
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
आयपीएल २०२२मध्ये दोन्ही संघांमधील शेवटच्या सामन्यात बंगळुरूने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला. आरसीबीसाठी लखनऊविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने ९६ धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती. लखनऊसाठी आरसीबी विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कृणाल पंड्याने २८ चेंडूत ४२ धावा केल्या. लखनऊविरुद्ध आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात जोश हेझलवूडने अवघ्या २५ धावांत ४ बळी घेतले. लखनऊसाठी आरसीबी विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, जेसन होल्डर आणि दुष्मंथा चमिरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

