Share

VIDEO : १५ वर्षाच्या पोरानं इंग्लंडचा दिग्गज कॅप्टन अ‍ॅलिस्टर कूकला केलं क्लीन बोल्ड!

Published On: 

मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज माजी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज अ‍ॅलिस्टर कूक याने चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. असे असले तरी त्याने आपल्या देशात आयोजित काऊंटी क्रिकेटमध्ये भाग घेणे सुरूच ठेवले आहे. यासोबतच तो स्थानिक आणि ग्रामीण क्रिकेटमधील अनेक संघांमध्ये सहभागी होताना दिसतो. काऊंटी क्रिकेटमध्ये तो एसेक्सकडून खेळतो. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम प्रस्थापित केले, परंतु अलीकडेच एका गावातील क्रिकेट सामन्यात एका १५ वर्षाच्या मुलाने त्याला क्लीन बोल्ड केले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका १५ वर्षांच्या मुलाने अ‍ॅलिस्टर कूकच्या दांड्या उडवल्या. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराला गोलंदाजी करणाऱ्या तरुण गोलंदाजाचे नाव कायरन शॅकलटन आहे. ग्रामीण क्रिकेट स्तरावर खेळल्या जात असलेल्या हेरिटेज चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अ‍ॅलिस्टर कूक बेडफोर्डशायर यंग फार्मर्स क्रिकेट क्लबकडून भाग घेतला.

बेडफोर्डशायर यंग फार्मर्स क्रिकेट क्लबसाठी अ‍ॅलिस्टर कूक पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याचा संघ १२ षटकांत १५५ धावांचे लक्ष्य पार करत होता. त्याने वेगवान २० धावा केल्या पण त्यानंतर युवा वेगवान गोलंदाजाने क्लीन बोल्ड केले. अखेरीस पॉटन टाऊन क्रिकेट क्लबने २६ धावांनी विजय मिळवला. अ‍ॅलिस्टर कूक हा २००६ ते २०१८ या काळात इंग्लंड संघाचा अविभाज्य भाग होता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!