मुंबई: अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोटनिही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. श्रीमती राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे देवेंद्र फडणवीस यांना तरी शोभत नाही. असा टोला लगावत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना सवाल केला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा खार पोलीस स्टेशनातील शाही पाहुणचाराचा व्हिडीओच समोर आणला. त्यामुळे राणांपेक्षा फडणवीस यांचीच पोलखोल झाली आहे. दुसरे असे की, श्रीमती नवनीत राणा या कधीपासून मागासवर्गीय झाल्या? त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरले आहे. त्यांनी देशाची फसवणूक केली. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून महाराष्ट्र सरकार तत्काळ बरखास्त करावे असे फडणवीस म्हणत असतील तर दादा कोंडके (Dada Kondke) यांना या ‘पांडू’गिरीवर ‘भाजपचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता. असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
2019 सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाडय़ा’ चित्रपट काढला असता. असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपच्या गौळणीने दुसऱ्यांना नाच्या म्हणणं शोभत नाय”; VIDEO ट्विट करत मिटकरींचा सदाभाऊंना टोला
- “…नरेंद्र मोदी असते तरी शिवसैनिकांनी गाडी फोडली असती”, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य
- भाजपच्या धमन्यांत हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे- संजय राऊत
- “चार मते कमी पडली तरी चालेल, पण माझे माझ्या राज्यावर…”, सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
- “सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूणं हाती घेतलेल्या माणसासारखी”, अमोल मिटकरींचा टोला

