🕒 1 min read
मुंबई: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि राष्ट्र्वादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मिटकरी चर्चेत आले होते. यावरच सदाभाऊ यांनी ‘अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे’, असे विधान केले होते. यालाच मिटकरी यांनी आज (२७ एप्रिल) ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“भाजपच्या गौळणीने दुसऱ्यांना नाच्या म्हणणं शोभत नाय”, असे विधान करताना एक व्यक्ती या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यालाच ‘लायकीच दाखवली काकांनी तर..’ असे कॅप्शन देत अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
लायकीच दाखवली काकांनी तर ???????? pic.twitter.com/Wzjojd5rrJ
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 26, 2022
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे. प्रत्येक समाजाची नेते पक्षात घ्यायची, जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचे काम राष्ट्रवादीमधील नेते करतात,” अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. तसेच महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही. पण एक शकुनी मामा सतरंजी वरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते. आमची पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला होता.
अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर-
डोंबिवली पलावा येथे आयोजित एका कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी म्हटले की, “मी शेतकरी कुटुंबातला साधा माणूस आहे. सदाभाऊ स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेतात मात्र मी त्यांच्यावर टीका करण्याइतका मोठा नाही. पण सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूनं हाती घेतलेल्या माणसासारखी झाले आहे का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जसा पिंजरा चित्रपटात ज्या गुरुजींनी तमाशाला विरोध केला आणि शेवटी त्यांनाच नाचावे लागलं तशी परिस्थिती सदाभाऊंची झाली आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- भाजपच्या धमन्यांत हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे- संजय राऊत
- “…नरेंद्र मोदी असते तरी शिवसैनिकांनी गाडी फोडली असती”, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य
- “चार मते कमी पडली तरी चालेल, पण माझे माझ्या राज्यावर…”, सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
- “सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूणं हाती घेतलेल्या माणसासारखी”, अमोल मिटकरींचा टोला
- …तर दादा कोंडके यांना ‘भाजपचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
