Share

IPL 2022: उमरान मलिकच्या गोलंदाजीने पाकिस्तानी खेळाडू प्रभावित; म्हणाला “याला टी २० वर्ल्डकपमध्ये…”

Published On: 

मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात अनेक तरुण खेळाडूने आपली प्रतिभा दाखवली आहे. ज्यात सर्वात जास्त चर्चा सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याची होत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून तो १५० च्या स्पीडने गोलंदाजी करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याचे नाव संपूर्ण क्रिकेट क्षेत्रात चर्चेत आहे. नुकतेच पाकिस्तानच्या माजी खेळाडू राशिद लतिफनेही मलिकसंबधी मोठे वक्तव्य केले आहे.

उमरान मलिकच्या (umran malik) गोलंदाजीवर प्रभावित होऊन राशिद लतीफ (rashid latif) म्हणाले, “आयपीएलनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तयारीला सुरुवात करेल. आशिया चषक आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. उमरान मलिकला यापैकी एका स्पर्धेत संधी दिली पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर तो आशियाई फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो.”

राशिद लतीफ यांचे म्हणणे आहे की ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर उमरान सारख्या गोलंदाजांना संधी द्यायला हवी. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) खेळल्या गेलेल्या सामन्यात उमरान मलिकने अवघ्या २७ धावांत दोन बळी घेतले. त्याच्या चेंडूंचा वेग सामन्यात १४८.८ इतका होता. ज्यासाठी राशिद लतीफ यांनी उमरानचे कौतुक केले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!