🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर न्य़ा. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोप करणाऱ्या सतीश उके यांना ED ने अटक केली आहे. त्यांना कोर्टाने २६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या झालेल्या सुनावणीमध्ये सतीश उके यांच्यातर्फे वकील रवी जाधव यांनी युक्तीवाद केला आहे.
न्या. लोया यांचे एक महत्त्वाचे पत्र ED ने सतीश उके यांच्या घरी टाकलेल्या धाडीमध्ये जप्त केले आहे. उके यांच्या वकिलांनी गंभीर आरोप केला आहे. त्य़ा पत्राची प्रत देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच नागपूरमध्ये ईडीचे विशेष कोर्ट असूनही दोन्ही उके बंधूंना मुंबईत का आणण्यात आले असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावर कोर्टाने ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा देखील केली आहे.
याठिकाणी सतीश उके यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती लोया यांचे अखेरचे पत्र असल्याचा दावा करत त्यातील काही माहिती पत्रकारांना वाचून दाखवली. यामध्ये लोया यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता, असा दावा रवी जाधव यांनी केला. तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असून आपण खूप दबावात आहोत, असेही न्या. लोया यांनी लिहिले होते, असाही आरोप रवी जाधव यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –

