Share

“वॉर्नरला खरेदी करा तो चांगले रील बनवतो” ; चाहत्यांची राजस्थान संघाला अजब विनंती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामातील मेगा ऑक्शनसाठी अवघे काही दिवस उरले आहे. याच पार्श्वभूमीवर कोणते खेळाडू कोणत्या संघात जाणार आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. यात माजी खेळाडूंपासून तर चाहत्यांचाही समावेश आहे. बरेच चाहते आपल्या आवडत्या संघात दुसऱ्या संघातील खेळाडूंना खेळताना पाहू इच्छितात. नुकतेच राजस्थान रॉयल्सच्या ट्विटरवर संघाने चाहत्यांच्या अजब विनंत्यांचे स्क्रिनशॉट टाकले आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच काहींना काही विनोदी पोस्ट होत असतात. यावेळी त्यांनी ऑक्शनचे निमित्त साधत चाहत्यांच्या विंनतीचे फोटो टाकले आहेत. ज्यात काहींनी ” प्लिज वॉर्नर ला घ्या, तो मस्त रिल्स बनवतो’ तर एकाने “मिशेल मार्श ला घ्या नाहीतर मी तुम्हाला अनफॉलो” अशी धमकी सुद्धा दिली आहे. चाहत्यांच्या या अजब विनंत्या मजेशीर आहेत.

आयपीएल मेगा ऑक्शन १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बँगलोर येथे होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये १० संघ असणार आहे. ज्यात लखनऊ सुपरजाईंट्स आणि अहमदाबाद टायटन्स यांचा समावेश आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये देश विदेशातील ५९० खेळाडूंचा समावेश असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!