Share

IPL 2022 : बटलरची बातच न्यारी..! बक्षीस समारंभही गाजवत तब्बल सहा पुरस्कार केले नावावर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर मोठी खेळी खेळू शकला नाही. संपूर्ण सामन्यामध्ये तो निराश दिसला, पण आयपीएल बक्षीस समारंभात तो पूर्णपणे आनंदी दिसत होता. या हंगामामध्ये त्याला एक-दोन नव्हे तर सहा पुरस्कार देण्यात आले. ज्यामध्ये ऑरेंज कॅप, पॉवर प्लेअर ऑफ द सीझन, गेम चेंजर ऑफ द सीझन यांसारखे पुरस्कार प्रमुख होते.

जोस बटलरने सहा पुरस्कार जिंकले
ऑरेंज कॅप – जोस बटलर – १० लाख
सर्वाधिक चौकार – जोस बटलर – १० लाख
सर्वाधिक षटकार – जोस बटलर – १० लाख
पॉवर प्लेअर ऑफ द सीझन – जोस बटलर – १० लाख
मोस्ट वैल्युएबल प्लेयर आफ द ईयर – जोस बटलर – १० लाख
हंगामातील गेमचेंजर – जोस बटलर – १० लाख

संघाच्या पराभवामुळे जोस बटलर निराश
जोस बटलर आपल्या संघाच्या पराभवामुळे खूप निराश झाला आणि सामना संपल्यानंतर त्याने सांगितले की आम्हाला यावेळी ही ट्रॉफी जिंकायची होती. परंतु ते होऊ शकले नाही. हार्दिक पंड्याच्या टीमचे अभिनंदन. संघासाठी आवश्यक ती भूमिका निभावणे हाच माझा उद्देश आहे. चांगल्या संघावर प्रत्येकाचा विश्वास असतो तसेच आमचाही आमच्या संघातील प्रत्येकावर विश्वास आहे.

तो म्हणाला की, फायनल खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी दुर्दैवाने माझ्या कारकिर्दीत अनेक फायनल गमावल्या आहेत आणि पुन्हा एकदा असेच काही घडले जे निराशाजनक आहे. गेली दोन वर्षे आम्ही प्रेक्षकांविना खेळलो, पण पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये खेळण्याची उत्तम संधी मिळाली. यातून आमच्या संघातील युवा खेळाडूंनाही खूप काही शिकायला मिळेल. जे त्यांच्या करिअरला पुढील वाटचालीत मदत करेल.

जोस बटलरने आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. त्याने १७ सामन्यात ५७.५३ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या आणि चार शतके झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!