Share

IPL 2022: पंजाब किंग्जने वाढवली ताकद; ‘हा’ प्रशिक्षक बनवणार फलंदाजीची क्रमवारी घातक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ लवकरच सुरू होणार आहे आणि त्याआधीच पंजाब किंग्ज संघात एका अनुभवी दिग्गजाने प्रवेश केला आहे, जे उर्वरित संघासाठी मोठ्या आव्हानापेक्षा कमी नसेल. २६ मार्चपासून या स्पर्धेला चेन्नई आणि कोलकाता संघ यांच्यातील लढतीने सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व संघांनी पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान, पंजाब किंग्समध्ये या दिग्गजाला संघात आणून तयारी सुरु केली आहे.

पंजाब किंग्सने (punjab kings) संघात आणलेल्या दिग्गजाचे नाव ज्युलियन रॉस वुड (julian ross wood) असे आहे, जो इंग्लंडचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू राहिला आहे. एकेकाळी इंग्लंडसाठी मायदेशात सामने खेळलेले दिग्गज खेळाडू सध्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहेत. आता ज्युलियन रॉसला आयपीएल २०२२ मध्येही आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. मयंक अग्रवालच्या संघाने या माजी इंग्लिश फलंदाजाची नवीन हंगामासाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यांना ‘पॉवर हिटिंग’ प्रशिक्षक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आयपीएल २०२२ च्या लिलावात पंजाब किंग्जने अनेक स्फोटक फलंदाजांना खरेदी करण्यासोबतच आपला संघ मजबूत केला आहे. पण, त्यांच्या फलंदाजीचा पराक्रम आणि यावर्षी विजेतेपदाची भूक भागवण्यासाठी, फ्रँचायझीने ज्युलियन रॉस वुडची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. संघाने एक निवेदन जारी करून वुडच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. या संघात सामील झाल्यानंतर तो आता सहाय्यक प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्ससह फलंदाजांना क्रीजला चिकटून चेंडू मारण्याचा सल्ला देईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!