मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार अनेकवेळा मैदानावर मस्ती करताना दिसला आहे. तो जितका त्याच्या कर्णधारपदासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो मैदानावरील त्याच्या मस्त शैलीसाठीही ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या श्रीलंका-भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माची अशीच शैली पाहायला मिळाली. भारताने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा २३८ धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. या सामन्यादरम्यान रोहित अंपायरची फिरकी घेताना दिसला
झाले असे की , श्रीलंकेचा संघ जेव्हा २५ वे षटक खेळत होता, तेव्हा धनंजय डी सिल्वा पाहुण्या संघासाठी फलंदाजी करत होता, तर दुसरीकडे यजमानांसाठी रवींद्र जडेजा (ravindra jadeja) गोलंदाजी करत होता. या खेळीदरम्यान जडेजाने धनंजय डी सिल्वाला चेंडू फेकला तेव्हा चेंडू थेट धनंजय डी सिल्वाच्या पॅडवर गेला. चेंडू त्याच्या बॅटलाही लागल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे रिव्ह्यू घेण्यात काही अर्थ नव्हता, पण नंतर रोहित शर्मा (rohit sharma) अंपायरच्या दिशेने जात फिरकी घेतली. त्याने रिव्ह्यू घेण्याचे संकेत देत देत हात खाली घेतला यामुळे कमेंट्री बॉक्समध्येही सगळ्यांना हसू आले.
https://twitter.com/SportsHustle3/status/1503374424845987841?s=20&t=bPH7otEgfFcMVQHk_Ix-Kw
भारतीय संघाने श्रीलंकेला क्लीन स्वीप करत मालिका जिंकली आहे. भारतासाठी हा घरच्या मैदानावर १५ वा मालिका विजय ठरला आहे. कसोटीचा नव कर्णधार रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही- कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
- ‘ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न’ – मोहित कंबोज
- “शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये”, हिजाब प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- प्रविण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; नितेश राणे म्हणाले,“अपेक्षेप्रमाणे…”
- IPL 2022: एमसीसीने जारी केलेले नवीन नियम आयपीएलमध्ये लागू करण्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय!


