🕒 1 min read
नवी दिल्ली – मध्य प्रदेशच्या एका तरुणाला आयकर विभागाने नोटीस पाठविली. हा तरुण मध्य प्रदेशच्या खंडवा येथील देशगावमध्ये राहतो. या तरुणाच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार झाला असल्याने या संदर्भात आयकर विभागाने नोटीस पाठविली आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणाने सांगितले.
माहितीनुसार, हा तरुण एका शेतकऱ्याचा मुलगा असून तो एक मोबाईलचं दुकान चालवतो. तरुणाच्या अकाऊंटमधून 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आयकर विभागाने कारवाई केली. तरुणाच्या पॅन कार्डच्या आधारावर त्याचं मुंबईतील एक्सिस बँकेमध्ये अकाऊंट आहे. याच खात्यातून हा मोठा व्यवहार करण्यात आला आहे.
प्रवीणने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावाने मुंबईमध्ये एक बनावट अकाऊंट ओपन करण्यात आले आहे. त्याच्या अकाऊंटमधून 300 कोटींचा व्यवहार करण्यात आला असल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. त्याचं पॅनकार्ड घेऊन ही फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत एक्सिस बँकेकडे संपर्क केला असता त्यांनी तुमच्या नावाने अकाऊंट ओपन केल्याचे सांगितले आहे. एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी त्याने आपलं पॅन कार्ड दिले सांगितलं. तिथेच काही तरी घोटाळा असणार असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास देखील सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
