Share

पाकिस्तानचे रमीझ राजा म्हणजे ‘पलटी-मास्टरच’..! आता म्हणतात, “IPLबाबतचं ते वक्तव्य…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगभरातील अनेक क्रिकेटपटू फ्रेंचायझी टी-२० लीग खेळत असतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळण्यासाठी खेळाडूंनी इतर टी-२० लीग सोडल्याचे काही प्रसंगी दिसून आले आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) बाबतही असेच घडले आहे, आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंनी ही लीग सोडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चेअरमन रमीझ राजा यांचे एक विधान चर्चेत आले आहे.

एका मुलाखतीदरम्यान राजा म्हणाले, ”जर आम्ही पीएसएलमध्ये लिलाव सुरू केला आणि पर्स वाढवली, तरच खेळाडू पीएसएलमध्येच खेळतील आणि कोण पुन्हा आयपीएल खेळायला जाईल ते पाहता येईल.” राजा यांचे हे विधान आयपीएलचा १५वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आले होते, मात्र आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

आता राजा म्हणाले, ”माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आले. भारत आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील फरक मला माहीत आहे. पीएसएलमध्ये सुधारणा करण्याची आमची योजना आहे. आम्ही लिलाव मॉडेलचे अनुसरण करू.” आयपीएल आणि पीएसएलमध्ये फरक आहे. पीएसएलच्या विजेत्या संघाला सुमारे ३.५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळते, परंतु आयपीएल विजेत्याला जवळपास पाचपट रक्कम मिळते. आयपीएल विजेत्या संघाला गेल्या मोसमात २० कोटी रुपये मिळाले होते आणि तीच रक्कम या हंगामातही दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!