Share

आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यास सुजात आंबेडकरांना झाला होता विरोध!

Published On: 

मुंबई :  टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स म्हणजेच टिस मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना सहभागी होण्यास संस्थेकडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर हा कार्यक्रम विद्यार्थी संघटनांकडून रद्द करण्यात आला होता. संस्थेबाहेरील कोणालाही कार्यक्रमात सहभागी होऊ देण्याची परवानगी संस्थेनी दिली नाही, असे कारण सांगण्यात आले होते.

डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, १४ एप्रिललाटाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स संस्थेमध्ये आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण मिळाले होते. सुजात यांनी या कार्यक्रमाला येण्याची तयारी देखील दर्शवली होती. याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांनी ८ एप्रिलला संस्थेला दिले होते. त्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण असणार याचाही तपशीलही देण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन तीन दिवसासाठी करण्यात आले होते. मात्र, संस्थेने परवानगी नाकारल्यामुळे एकाच दिवसात हा कार्यक्रम आटोपण्यात आला.

संस्थेच्या कार्यक्रमासाठी बाहेरील व्यक्तीला विरोध झाल्याने विदयार्थी संघटनांकडून कार्यक्रम गुंडाळावा लागला. दरम्यान टिस मध्ये इतरही अनेक कार्यक्रम होत असतात. काही दिवसांपूर्वी शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला आहे. एका अहवालाचे प्रकाशनही झाले. त्यावेळी संस्थेच्या बाहेरील व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली. असे असताना सुजात यांनाच परवानगी नाकारण्याचे कारण काय, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!