मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आज डबल हेडरचा पहिला सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना (PBKS vs SRH) खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादला १५२ धावांचे आव्हान दिले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादचा तेजतर्रार गोलंदाज उमरान मलिकने भेदक मारा करत ४ बळी टिपले.
पंजाबचा डाव
मयंक अग्रवालच्या अनुपस्थितीत प्रभसिमरन सिंगने शिखर धवनसोबत पंजाबसाठी सलामी दिली. मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने धवनला (८) तर टी. नटराजनने प्रभसिमरनला (१४) झेलबाद केले. त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो (१२) सुचितच्या फिरकीवर पायचीत झाला. लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान यांनी पंजाबसाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. लिव्हिंगस्टोनने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. तो १९व्या षटकात बाद झाला, तर शाहरुखने २६ धावा जोडल्या. २०व्या षटकात पंजाबला एकही धाव घेता आली नाही, उमरान मलिकने टाकलेल्या या षटकात हैदराबादने ४ फलंदाजांना तंबूत धाडले. २० षटकात पंजाबचा संघ १५१ धावांवर आटोपला. उमरानने २८ धावांत ४ बळी घेतले. भुवनेश्वरने ३ फलंदाजांना बाद केले.
4 wickets for Umran Malik
60 for Liam LivingstoneDo the Punjab Kings have enough runs on the board?
We will find out as we build-up to the SRH run-chase #PBKSvSRH | #TATAIPL
Follow the game here https://t.co/NsKw5lnFjR pic.twitter.com/HNsRtjVWnz
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी. नटराजन.
सनरायझर्स हैदराबाद – शिखर धवन (कप्तान), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


