Share

IPL 2022 MI vs SRH : बूम-बूम-बुमराह..! मॅचमध्ये घेतली फक्त एक विकेट अन् नावावर केला ‘मोठा’ विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये स्पर्धेचा ६५वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात काल १७ मे रोजी खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने ३ धावांनी विजय मिळवला. मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात जसप्रीत बुमराह फक्त एक विकेट घेऊ शकला असला तरी त्याने या एकमेव विकेटने इतिहास रचला आहे.

जसप्रीत बुमराह हा टी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड करून हा विक्रम रचला. या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने २२३ विकेट्स घेतल्या आहेत, तर जयदेव उनाडकट २०१ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

असा रंगला सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. स्पर्धेच्या ६५व्या सामन्यात हैदराबादने मुंबईला ३ धावांनी हरवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईसाठी रोहित-इशानने चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधली फळी ढासळल्यानंतर टिम डेव्हिडने धुवांधार फलंदाजी करत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, पण १८व्या षटकात तो बाद झाला आणि मुंबईने सामना गमावला. हा मुंबईचा दहावा पराभव ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!