Share

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवर ICC नं घातली बंदी; ‘हे’ आहे कारण!

Published On: 

मुंबई : डोपिंगप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज झुबेर हमजाला आयसीसी (ICC)ने निलंबित केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत हमजा पॉझिटिव्ह आढळला होता. हमजाने स्वेच्छेने निलंबन घेतले आहे. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हमजा आयसीसीच्या तपासात सहकार्य करत असल्याचे सांगितले होते.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या प्रकरणावर सांगितले, की झुबेर पॉझिटिव्ह आलेल्या डोपिंग चाचणीवर वाद घालत नाही, आयसीसीला पूर्ण सहकार्य करत आहे. आयसीसीला लेखी दिल्यानंतर त्यांनी लगेचच स्वेच्छेने निलंबनाची मागणी केली. हमजाची बंदी कायम ठेवल्याने आयसीसीची चौकशी आता संपुष्टात आली आहे.

आयसीसीने सांगितले, की हमजाने १७ जानेवारी २०२२रोजी चाचणीसाठी नमुना दिला होता. ज्यामध्ये फ्युरोसाईडचा अंश आढळून आला. मार्च २०२२ पासून ही बंदी लागू आहे. अशा परिस्थितीत हमजा डिसेंबरमध्ये कमबॅक करेल. डोपिंगबाबत आम्ही शून्य सहनशीलतेच्या धोरणाखाली काम करतो, क्रिकेट स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना इशारा आहे की ते त्यांच्या शरीरात जे काही घेतात त्यासाठी ते जबाबदार आहेत, असेही आयसीसीने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!