मुंबई : आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीचा आपल्या संघात समावेश केला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या जागी ब्लेसिंग मुजारबानीला संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे वूड आयपीएलमधून बाहेर पडला, पण आता त्याच्या जागी झिम्बाब्वेचा खेळाडू ८ वर्षांनंतर आयपीएलमध्ये सामील होणार आहे.
मुजारबानी लखनऊ संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती, नंतर झिम्बाब्वे येथील भारतीय दूतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला. झिम्बाब्वेमधील भारतीय दूतावासाने ब्लेसिंग मुजारबानीसोबतचा एक फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय राजदूत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
Ambassador met with Mr Blessing Muzarabani, the Zimbabwean bowler, as he prepared to leave for #IPL2022.
Ambassador wished him & his team #LucknowSuperGiants the very best. #IndiaAt75 @IndianDiplomacy @MEAIndia @iccr_hq pic.twitter.com/8AMPO9Xbyd
— IndiainZimbabwe (@IndiainZimbabwe) March 21, 2022
२५ वर्षीय वेगवान गोलंदाज मुजारबानी हा ८ वर्षांत आयपीएलचा भाग होणारा पहिला झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू आहे. तातेंदा तैबू, रे प्राइस आणि ब्रेंडन टेलर या झिम्बाब्वेच्या खेळाडूंना याआधी आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला होता. हरारे येथे जन्मलेल्या, मुजारबानीने झिम्बाब्वेचे सहा कसोटी, ३० एकदिवसीय आणि २१ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे आणि ८३ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये मुलतान सुलतान्सचे प्रतिनिधित्व केले आहे. टी-२० कारकिर्दीत, त्याने ४० सामने खेळले आहेत आणि ४४ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

