Share

“आम्हा मुंबईकरांना नागपूर प्रिय”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

नागपूर:  विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून (२२ मार्च)  शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) हे सुद्धा या अभियानासाठी सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले.

“नागपूरच्या नेत्यांना मुंबई जास्त आवडते व आम्हाला नागपूर प्रिय आहे”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मोदी साहेब खूप काम करत आहे. ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असे बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवल आहे. असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजप प्रेदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान शिवसेनेने नागपूरसह संपूर्ण विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्क मोहिमेच्या माध्यमातून पक्ष संघटनेला सशक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!