Share

IPL 2022 LSG vs SRH : केन विल्यमसनच्या विकेटमागं ‘असा’ होता मास्टरप्लॅन..! ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या आवेश खानचा खुलासा!

Published On: 

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानला SRH vs LSG सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला आहे. नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर सोमवारी रात्री झालेल्या लखनऊ विरुद्ध हैदराबाद सामन्यात आवेश खानने चमकदार कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आवेश खानने या सामन्यात ४ षटकात अवघ्या २४ धावा देत ४ बळी घेतले. त्यामुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला आहे.

आवेश खानने आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकात विरोधी कर्णधार केन विल्यमसन (Kane williamson) आणि सलामीवीर अभिषेक शर्मा (abhishek sharma) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. येथून त्याने हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्या एका षटकाने सामना लखनऊच्या झोळीत पडला. ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्यानंतर केन विल्यमसनच्या विकेटवर चर्चा करताना आवेश खानने (avesh khan) त्याचा गेम प्लॅन सांगितला.

आवेश खान म्हणाला, “पॉवर प्ले आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये मी विकेट्स कशी काढू शकतो, ही माझी योजना नेहमीच असते. केन विल्यमसनला बाद करण्यासाठी मला हळू चेंडू टाकायचा होता कारण चेंडू खेळपट्टीच्या पृष्ठभागावर आदळत असल्याचे आम्हाला वाटले. तसेच, मी नेहमी डॉट बॉल टाकण्याचा आणि यॉर्कर मारण्याचा प्रयत्न करतो. कर्णधार आणि सपोर्ट स्टाफकडून मला नेहमीच खूप पाठिंबा मिळतो आणि मला त्याच गतीने गोलंदाजी करत राहायचे आहे.”

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!