Share

IPL 2022 LSG vs RCB : पहिलाच चेंडू आणि बाद.! विराट कोहली शून्यावर माघारी; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म सुरू आहे. RCBचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG vs RCB) सामन्यात शून्यावर (Golden Duck) बाद झाला. पहिलाच चेंडू खेळताना विराटने आपली विकेट दान केली. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटीलवर सुरू असलेल्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

विराट कोहलीची आयपीएल २०२२च्या आतापर्यंतच्या सात सामन्यांमधील कामगिरी संमिश्र आहे. लखनऊविरुद्धच्या या लीगच्या ३१व्या सामन्यात वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने त्याला दीपक हुडाकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गेल्या सात सामन्यांमध्ये कोहलीने या मोसमात ४१*,१२,५,४८,१,१२,० अशा धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत विराट कोहली चार वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. या लीगमध्ये विराट ७ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

https://twitter.com/alive4virat/status/1516428026749554691

२००८ मध्ये आशिष नेहराने, २०१४मध्ये संदीप शर्माने विराटला गोल्डन डकवर बाद केले आहे. यानंतर, २०१७मध्ये, नॅथन कुल्टर-नाईलने त्याला गोल्डन डकवर बाद केले. आयपीएलच्या या मोसमातील पॉवरप्लेमध्ये विराट कोहलीने निराशाजनक कामगिरी केली आहे. या मोसमात आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये खेळलेल्या चार डावांमध्ये तो तीनदा बाद झाला आहे आणि त्याने ८.३३च्या सरासरीने आणि १०८.६९च्या स्ट्राइक रेटने फक्त २५ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने ७ सामन्यात १९.८३ च्या सरासरीने आणि १२३.९६च्या स्ट्राइक रेटने फक्त ११९ धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या ४८ धावा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!