मुंबई : आययपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) सामना होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान फाफ डु प्लेसिसच्या झुंजार खेळीच्या जोरावर बंगळुरूने लखनऊला १८२ धावांचे आव्हान दिले आहे. विराट कोहलीला ‘गोल्डन डक’च्या रुपात गमावल्यानंतर डु प्लेसिसने ९६ धावा ठोकल्या आणि संघाला सावरले.
बंगळुरूचा डाव
लखनऊचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना माघारी धाडत बंगळुरूचा चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने प्रथम अनुज रावतला (४) केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहलीला (०) दीपक हुडाकरवी गोल्डन डकचा शिकार बनवले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने झटपट २३ धावा केल्या, कृणाल पंड्याने त्याला बाद केले. यानंतर शाहबाज अहमदसोबत डु प्लेसिसने किल्ला लढवला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. १६व्या षटकात शाहबाज धावबाद झाला. त्याने २६ धावा केल्या. शतकाच्या जवळ पोहोचलेल्या डु प्लेसिसला जेसन होल्डरने तंबूत पाठवले. डु प्लेसिसने ११ चौकार आणि २ षटकारांसह ९६ धावा केल्या. शेवटच्या षटकात तो बाद झाला. या षटकात होल्डरने फक्त ४ धावा दिल्या. २० षटकात बंगळुरूला ६ बाद १८१ धावा करता आल्या.
CLASS KNOCK! ????????
Well played, @faf1307! ????????????????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB pic.twitter.com/29kwOnhPb9
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 19, 2022
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

