🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात आज संध्याकाळी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना एकच संधी असून, येथे पराभव झाला तर स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगणार आहे. या सामन्यासाठी लखनऊ आणि बंगळुरूच्या संघ त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंसोबत मैदानात उतरतील. आजच्या सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल ते जाणून घेऊया.
लखनऊची सलामीची जोडी क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल धमाकेदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम रचला आहे. दीपक हुडाने संपूर्ण मोसमात चांगली फलंदाजी केली असून या महत्त्वाच्या सामन्यातही संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याबरोबर आवेश खान, मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांनी यंदाच्या हंगामात आतापर्यंत गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मार्कस स्टॉइनिसने कोलकाताविरुद्धच्या शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे हे सर्व खेळाडू बेंगळुरूविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम असण्याची दाट शक्यता आहे.
It’s ELIMINATOR DAY! ❤️????????#SuperGiants are all set to come victorious out of this trial by fire
Tune in at 7:30 pm and cheer away #SuperFam ????#AbApniBaariHai???? #IPL2022 ???? #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 #LSGvsRCB pic.twitter.com/cYj2P7lYfX
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 25, 2022
लखनऊ संभाव्य Playing ११
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई
गुजरात विरुद्धच्या मागील सामन्यात विराट कोहलीने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे विराटला लय गवसणे हे बंगळुरूसाठी चांगले संकेत आहेत. कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि शाहबाज अहमद यांनी संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा चांगली फलंदाजी केली आहे. अनुभवी दिनेश कार्तिकने आपल्या ‘मॅच फिनिशिंग’ कौशल्याने या संपूर्ण हंगामात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गोलंदाजीत वनिंदू हसरंगाचा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या शर्यतीत समावेश आहे. हर्षल पटेल आणि जोश हेझलवुड यांच्याकडे गोलंदाजीच्या कौशल्याने सामना फिरविण्याची क्षमता आहे.
Mr. Finisher Supreme & Mr. Reliable in all readiness for tonight’s action. ????????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #LSGvRCB pic.twitter.com/tVYHefXv1x
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
बंगळुरू संभाव्य Playing ११
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वनइंडू हसरंगा, हर्षल पटेल/आकाश दीप, सिद्धार्थ कौल/मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
