🕒 1 min read
मुंबई : उर्फी जावेद नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. सध्या उर्फी जावेद आणि राहुल वैद्य यांच्यामध्ये शाब्दिक वाद चालू आहेत. राहुलने उर्फीचे नाव न घेता ड्रेसिंग सेन्सवर भाष्य केलं होत. यावर आता उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. तिने राहुल वैद्य याला सोशल मीडियावर लिंगवादी ढोंगी म्हटले आहे.
राहुल वैद्यचे नुकतेच नवीन गाणे रिलीज झाले आहे. त्या गाण्याचे शीर्षक आहे ‘नॉटी बालम’. या गाण्याचे पोस्टर शेअर करताना उर्फीने लिहिले कि, “स्त्रियांच्या शरीराचा वापर तुमच्या फायद्यासाठी करा, पण जेव्हा ती महिला स्वतःच्या इच्छेने ते काहीतरी निवडते, काहीतरी परिधान करते आणि पोस्ट करते तेव्हा काही लोक वैतागतात”.
एवढ्यावरच उर्फी थांबली नाही उर्फीने लिहिले, “मला एक गायक म्हणून राहुल वैद्य खूप आवडतो पण माझ्या नजरेत त्याने त्याचा आदर गमावला आहे.”

उर्फी जावेद तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सतत चर्चेत असते. अनेकदा अनोख्या स्टाईलमध्ये दिसली की ती जे काही करते ते स्टाईल बनते. मात्र यावेळी राहुल वैद्य यांनी तिच्या स्टाईलवरून तिच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
