🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला सलग आठव्या पराभवाला (LSG vs MI) सामोरे जावे लागले आहे. वानखेडे मैदानावर रंगलेल्या स्पर्धेतील ३७व्या सामन्यात लखनऊने मुंबईला ३६ धावांनी मात दिली. यासह मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान केएल राहुलने यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठोकले आणि लखनऊने मुंबईला १६९ धावांचे आव्हान दिले. या मोसमातील पहिले शतकल राहुलने मुंबईविरुद्धच केले होते. प्रत्युत्तरात मुंबईचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले आणि त्यांना २० षटकात १३२ धावांपर्यंतच पोहोचता आले.
मुंबईचा डाव
लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संथ सुरुवात केली. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी ४९ धावांची सलामी दिली. रवी बिश्नोईने इशानला (८) फिरकीत अडकवले. त्यानंतर आलेले डेवाल्ड ब्रेविस (३), सूर्यकुमार यादव (७), हेसुद्धा स्वस्तात बाद झाले. तिलक वर्मा आणि कायरन पोलार्ड यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. मुंबईला शेवटच्या ३ षटकात ५० धावांची आवश्यकता होती. १८व्या षटकात तिलकला होल्डरने झेलबाद केले आणि सामना मुंबईपासून दूर नेला. तिलकने २ चौकार आणि २ षटकारासह ३८ धावांची खेळी केली. पोलार्डही शेवटच्या षटकात बाद झाला आणि मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले. कृणालने टाकलेल्या या षटकात मुंबईचे तीन फलंदाज माघारी परतले. २० षटकात मुंबईला ८ बाद १३२ धावांपर्यंतच पोहोचता आले. लखनऊकडून कृणालने १९ धावांत ३ बळी घेतले.
We're back to winning ways! What a match! ????
Bowlers ne chaar chand laga diye ????#AbApniBaariHai #IPL2022 #LSGvsMI pic.twitter.com/Uv6BjYYBvR— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
Top class bowling from Lucknow pile the misery on Mumbai Indians' season
8 losses in a row for MI ‼️#LSGvMI | #IPL2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 24, 2022
लखनऊचा डाव
कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनऊला संयमी सुरुवात करून दिली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने डी कॉकला (१०) बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर राहुलसह मनीष पांडेने भागीदारी केली. राहुलने १०व्या षटकात आक्रमक पवित्रा धारण केला आणि मंदावलेली धावगती सुधारली. राहुलल्या अर्धशतकानंतर पांडेला (२२) पोलार्डने बाद केले. मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या अनुक्रमे ० आणि एका धावेवर माघारी परतले. दीपक हुडालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर राहुलने एका बाजुने फटकेबाजी करत आयपीएलमधील चौथे अर्धशतक ठोकले. राहुलचे हे यंदाचे मुंबईविरुद्धचे दुसरे शतक आहे. राहुलने १२ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०३ धावा उभारल्या. २० षटकात लखनऊने २ बाद १६८ धावा केल्या. मुंबईकडून रिले मेरेडिथ आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.
लखनऊ सुपर जायंट्स –क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), मनीष पांडे, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
