🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं दिला जाणारा पहिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज मुंबईत येणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार अशी चर्चा कित्येक दिवसांपासून होत होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करू असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिल्यानंतर काल दिवसभर शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. त्यात एका ८० वर्षांच्या आजींचा देखील सहभाग होता. या आजींचं नाव चंद्रभागा शिंदे असं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी या आजींची विचारपूस केली. त्यानंतर आता ठाकरे कुटुंब संध्याकाळी सहाच्या सुमारास परळला चंद्रभागा आजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
काल चंद्रभागा आजी मातोश्राबाहेर ठाण मांडून बसल्या. “राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येऊनच दाखवावं. आम्ही गुपचूप येऊ आणि हनुमान चालिसा म्हणून जाऊ, असं राणा दाम्पत्याला वाटलं असेल. पण तसं काही आम्ही होऊ देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून मी शिवसेनेत आहे. पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. मातोश्रीला कोणी आव्हान देत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येण्याची हिंमत करूनच दाखवावी”, असे आजी काल म्हणाल्या. आजींचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत युवासैनिकांनी ‘राणा दाम्पत्य कायर है, आजी आमची फायर है’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
