Share

VIDEO : महाराष्ट्र-राजस्थानच्या क्रिकेटपटूंमध्ये राडा..! स्मृती मंधानाला केलं ‘मंकडिंग’ आणि मग पुढे..!

Published On: 

मुंबई : भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. बीसीसीआयने आयोजित केलेल्या महिला टी-२० लीगमध्ये (Womens T20 Trophy) आज स्मृतीच्या विकेटवरून मोठा वाद झाला. महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यात सामना सुरू होता. यादरम्यान महाराष्ट्राचा संघ सामन्यात बराच पुढे होता. दरम्यान, गोलंदाजाने मंधानाला मंकडिंग पद्धतीने धावबाद केले. यानंतर तिचा राजस्थानच्या खेळाडूंशी वादही झाला. शेवटी थर्ड अंपायरने स्मृतीला आऊट दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाला ७ विकेट्सवर केवळ १०२ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मंधाना आणि एस. शिंदे यांनी महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून दिली. ८.१षटकांनंतर संघाची धावसंख्या बिनबाद ४६ धावा होती. पण ९व्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यापूर्वी स्मृती क्रीजच्या बाहेर आली. यावेळी गोलंदाजी करणाऱ्या केपी चौधरीने तिला मंकडिंग पद्धतीने धावबाद केले. यानंतर मैदानावर वादाची परिस्थिती निर्माण झाली.

https://twitter.com/krithika0808/status/1518097034401566720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518097034401566720%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-smriti-mandhana-heated-war-of-words-with-rajasthan-players-after-controversial-run-out-4213148.html

थर्ड अंपायरने स्मृती मंधानाला नियमानुसार धावबाद दिले. मात्र, या निर्णयावर ती असमाधानी होती. तिने ३० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या. शिदेने ३८ चेंडूत ३० धावा केल्या. तीही धावबाद झाली. मात्र टीएस हसबनीसने नाबाद ३९ आणि एमआर मार्गीने नाबाद ५ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. महाराष्ट्राने १८.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!