Share

IPL 2022 LSG vs MI : वानखेडेवर मुंबईनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज स्पर्धेतील ३७वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होणार आहे. चालू मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना आहे. वानखेडे मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊचा संघ सातपैकी चार सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे, तर मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही आणि संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

गेल्या सामन्यात लखनऊचा संघ आरसीबीविरुद्ध १८ धावांनी पराभूत झाला होता. संघाच्या फलंदाजीच्या कामगिरीत घसरण झाली आहे. टॉप ऑर्डरमध्ये क्विंटन डी कॉकच्या बॅटमधून धावा येत नाहीत, तर मनीष पांडेही सतत फ्लॉप ठरत आहे. मात्र, संघाचा कर्णधार केएल राहुलची बॅट सुस्थितीत असून मुंबईविरुद्धचा त्याचा विक्रमही उत्कृष्ट आहे. या संघाविरुद्ध त्याने या मोसमातील एकमेव शतकही झळकावले. दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांना मधल्या फळीत अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. याशिवाय संघाला त्यांचे अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि जेसन होल्डर यांच्या फलंदाजीचा पुरेपूर फायदा घेण्याची गरज आहे.

हा मोसम मुंबई इंडियन्ससाठी दुःखद स्वप्नसारखा आहे. सलग सात पराभवांमुळे संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मात्र, आता आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी संघाला अधिक चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. इशान किशन आणि रोहित शर्मा या दोघांच्या धावा चांगल्या कामगिरीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचवेळी संघाला कायरन पोलार्डच्या कामगिरीचाही थोडा विचार करावा लागेल आणि बाहेर बसलेल्या पर्यायांकडे लक्ष द्यावे लागेल. जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत विकेट घेता आलेल्या नाहीत आणि त्यामुळे इतर गोलंदाज मार खात आहेत. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची कामगिरी संघासाठी चांगलीच झाली आहे.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.

लखनऊ सुपर जायंट्स –क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), मनीष पांडे, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!