Share

IPL 2022 KKR vs LSG : प्लेऑफमधून बाहेर गेल्यानंतरही कोलकाताचा कॅप्टन आनंदी; ‘हे आहे कारण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात २ धावांनी झालेल्या पराभवानंतर (KKR vs LSG) कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ”हा माझ्या सर्वोत्तम सामन्यांपैकी एक सामना होता”, असे श्रेयसने सांगितले. त्याने लखनऊच्या फलंदाजीचेही कौतुक केले आणि आपल्या संघाच्या कामगिरीवरही वक्तव्य केले.

केकेआरचा कर्णधार म्हणाला, ”मी अजिबात निराश नाही. मी खेळलेल्या सर्वोत्तम क्रिकेट सामन्यांपैकी हा एक होता. ज्या पद्धतीने आपण आपली भूमिका आणि वृत्ती ठेवायला हवी होती ती उत्कृष्ट होती. रिंकूने ज्या पद्धतीने आम्हाला शेवटपर्यंत नेले ते मला आवडले, पण दोन चेंडू बाकी असताना, दुर्दैवाने तो फटका नीट टाइम झाला नाही. तो खूप दुःखी होता.”

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, ”मला आशा होती की तो (रिंकू) आमच्यासाठी खेळ पूर्ण करेल आणि हिरो होईल, परंतु तरीही त्याने एक चांगली खेळी खेळली आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. मला वाटले नव्हते, की विकेट अशी होईल. मला वाटले की फिरकीपटूंना काही मदत मिळेल. लखनऊ सुपरजायंट्सने चांगली धावसंख्या उभारली. पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्यानंतरही आमच्यासाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती होती, लक्ष्याचा पाठलाग करून ते शक्य तितके जवळ घेऊन त्यांच्यावर दबाव आणण्याची आमची मानसिकता होती.”

असा रंगला सामना…

क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर चित्तथरारक लढतीचा आनंद घेता आला. केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या २ धावांनी कोलकाता नाइट रायडर्सला (KKR vs LSG) मात दिली आणि १८ गुणांसह प्लेऑफचे तिकीट मिळवले. कोलकातासाठी करो या मरो असलेल्या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला २११ धावांचे आव्हान दिले. सलीमीवीर डी कॉकने १० चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी करत १४० धावांची शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात अवघड वाटणाऱ्या या आव्हानाला कोलकाताने शेवटपर्यंत तोंड दिले. शेवटच्या षटकात २१ धावांची गरज असताना रिंकू सिंह मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि कोलकाताने हा सामना गमावला. या पराभवामुळे कोलकाताचे हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!